मुख्यमंत्र्यांचे ओएसडी पत्र राज्यपालांकडे पोहोचले!

Images may be subject to copyright

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे ओएसडी मंत्र्यांच्या खातेवाटपाची यादी घेऊन राज्यपालांकडे पोहोचले आहे. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवारांनी खातेवाटपावर भाष्य केलं. ते शुक्रवारी (१४ जुलै) मुंबईत पत्रकारांशी बोलत होते. अजित पवार म्हणाले, “मी वेगवेगळ्या मान्यवरांच्या मंत्रीमंडळात काम केलं आहे. त्या-त्यावेळी खातेवाटप हा अधिकार मुख्यमंत्र्यांचा असतो. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे याबाबतचा निर्णय घेतील.” “मला जी माहिती मिळाली त्यानुसार, राज्यपालांकडे याबाबतची यादी गेली आहे. त्यात वेगवेगळ्या मंत्र्यांना कोणती खाती दिली आहेत हे जाहीर होईल. त्यानुसार मंत्री जबाबदारी घेतील आणि कामाला सुरुवात करतील,” असंही अजित पवारांनी नमूद केलं.

Leave a comment